नवीन Fastag योजना, आता फक्त 3 हजार रुपयात वर्षभर कुठेही प्रवास, नितीन गडकरींची घोषणा | Fastag Annual Pass Launch

नितीन गडकरी हे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री आहेत व त्यामुळे यांनी एक मोठा निर्णय घेतलेला असून या निर्णयांमध्ये वाहन चालकांना आता वारंवार टोल भरण्याची चिंता दूर करण्यात येणार आहे, अशा पद्धतीचे त्यांनी माहिती दिली व या संबंधित नेमकी काय प्रक्रिया केली जाणार, त्याच पद्धतीने कोणती सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली जाणार, अशा प्रकारची संपूर्ण माहिती त्यांनी ट्विट च्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे. राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करत असताना वाहन चालकाला वारंवार टोल भरावा लागतो त्यामुळे मोठा वेळ व पैसे गुंतवले जाते.

 

अशा प्रकारची टोल भरण्याची अडचण आता दूर करून केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार 15 ऑगस्ट 2025 पासून FASTag अन्युअल पास उपलब्ध करून देण्यात आहे. यामधील मुख्य प्रक्रिया म्हणजे 3000 रुपये भरून एक प्रकारची पास वर्षभरासाठी वाहन चालकाला दिली जाईल, व त्याच पास वरून वर्षभराचा प्रवास तेव्हा फास्टॅग अन्युअल पास वरून करता येईल. अशा पद्धतीची संपूर्ण माहिती ट्विट करून नितीन गडकरी यांनी दिली.

 

ते म्हणाले त्रास मुक्त महामार्ग प्रवासाच्या दिशेने एक परिवर्तनीय पाऊल म्हणून फास्टट्रॅक विषयीचा निर्णय घेत आहोत, त्याच पद्धतीने फास्टट्रॅक बाबतची प्रक्रिया 15 ऑगस्ट 2025 पासून चालू होईल, त्यामुळे वाहन चालकांना फास्टट्रॅकचा कालावधी एक वर्षापर्यंत किंवा 200 ट्रिप पर्यंतचा असणार आहे, यामध्ये जिप, कार, व्ह्यान गैरव्यवसायिक खाजगी वाहनांसाठी असणार आहे. अशाप्रकारे केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटच्या माध्यमातून अशा प्रकारचे संपूर्ण माहिती दिलेली आहे.

 

राज्य शासनाची शेती AI धोरणाला मंजुरी, शासनाचे दोन मोठे निर्णय, शेतकऱ्यांना होणार फायदा