राज्य शासनाची शेती AI धोरणाला मंजुरी, शासनाचे दोन मोठे निर्णय, शेतकऱ्यांना होणार फायदा | Government Decisions On Agriculture

राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी विभागाशी संबंधित असलेले दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे 17 जून रोजी ही शासनाची बैठक पार पडली, त्यामध्ये विविध प्रकारचे निर्णय घेतलेले असून त्यात मुख्यतः शेतकऱ्यांसाठीचे दोन निर्णयांचा समावेश आहे, कृषी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या धोरणास शासनाने मान्यता दिलेली आहे, शासनाच्या माध्यमातून घेतलेला दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे गावामध्ये शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज कवळावा यासाठी ग्राम स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात शासनाच्या माध्यमातून मान्यता देण्यात आलेली आहे.

 

शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या सुविधा शेती विषयक तंत्रज्ञान हवामान सल्ला शेती पिकाबाबत ची माहिती हवामान अंदाज अशा विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी शासनाच्या माध्यमातून मागील काही दिवसांपूर्वीच महाविस्तार ॲप लॉन्च करण्यात आलेला आहे, या ॲपच्या माध्यमातून विविध प्रकारची माहिती शेतीविषयक शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जात आहे, व यातच एक भर म्हणून शासनाने इतर प्रकारचे निर्णय सुद्धा घेतलेले आहे.

 

शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चर्चा केल्यानंतर शेती विषयक AI धोरणाविषयीची मान्यता देण्यात आलेली आहे, हे धोरण 2025 ते 2029 या कालावधीसाठी लागू असणार आहे, यामध्ये ड्रोन चा वापर रोबोट पूर्वानुमान विश्लेषण व संगणकीय दृष्टी क्षमता तंत्रज्ञान इत्यादी त्यासह इतर प्रकारच्या ऍग्रो स्टॅग सारख्या ॲपचा वापर अशा विविध प्रकारे सर्व बाबींना वापरून गती आणणार असल्याची माहिती देण्यात आली, राज्य शासनाच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये हवामान केंद्र बसवेल. अशा प्रकारचे महत्त्वाचे निर्णय शासनाच्या माध्यमातून शेती विषयक घेण्यात आलेले आहे.

WhatsApp Icon