हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी राज्यातील मान्सूनचा अंदाज व्यक्त केलेला आहे, मागील पाच-सहा दिवसांपूर्वी राज्यातील विविध भागांमध्ये पावसाने सुरुवात केलेली होती, परंतु त्यानंतर आता पावसाने उघडेप लावलेली आहे, परंतु पुन्हा एकदा पाऊस राज्यामध्ये दाखल होऊन विविध भागांमध्ये भाग बदलत पाऊस पडेल, अशा प्रकारचा इशारा हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी व्यक्त केलेला आहे.
पंजाब डख यांनी दिलेल्या माहितीनुसार 9 तारखेपासून ते 12 तारखेपर्यंत सर्वसाधारण प्रकारचा पाऊस राज्यातील विविध भागांमध्ये भाग बदलत स्वरूपाचा पडणार आहे, तर 13 तारखेपासून 20 ते 21 तारखेपर्यंत अशा प्रकारचा हा मान्सूनचा प्रवास वाढत जाईल व याचे प्रमाण सुद्धा राज्यातील विविध भागांमध्ये बघायला मिळेल अशा प्रकारचा अंदाज व्यक्त केलेला आहे, 13 तारखेला नंतरचा पाऊस मुसळधार स्वरूपाचा असेल.
साधारणतः 11 ते 12 तारखेपासून राज्यातील विविध भागांमध्ये पावसा ला सुरुवात होणार आहे, त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल व तुमच्या शेतातील शेतीविषयक काही कामे राहिली असेल, तर लवकरात लवकर ती कामे 11 तारखेपर्यंत उरकून घ्यावी, कारण त्यानंतर मात्र शेतकऱ्याला पेरणीसाठी पोषक वातावरण निर्माण होईल, शेतकऱ्यांनी जमिनीमध्ये एक फूट ओल गेल्याशिवाय पेरणी करू नये, जर तुमच्या भागामध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस पडला असेल किंवा पडेल तेव्हाच पेरणीचा निर्णय शेतकऱ्यांनी घ्यावा अशाप्रकारे पंजाब डख यांनी दिलेला हा अंदाज अर्थातच शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरू शकतो.
घरकुल यादी 2025 जाहीर, आता मोबाइल वर बघता येणार, पहा संपूर्ण प्रोसेस