प्रत्येक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात त्यामध्ये शेतकरी विधवा महिला यांना योजनेच्या माध्यमातून विविध प्रकारचा लाभ दिला जातो परंतु प्रत्येक जिल्ह्यामध्ये विविध कालावधीमध्ये ही योजना राबवली जाते व आता पंधरा जुलै पर्यंत विविध जिल्ह्यात ही योजना राबवली जात आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना प्रश्न होते की आमच्या जिल्ह्यांमध्येही योजना चालू आहे की नाही त्यामुळे यातील महत्त्वाची बाब म्हणजे काही ठिकाणी ऑनलाइन तर काही ठिकाणी ऑफलाइन अशा पद्धतीने जिल्हा परिषद योजनांची अर्ज मागवले जातात.
ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया काही जिल्ह्यांमध्ये असल्याने अनेक शेतकऱ्यांना याबद्दल माहिती नसते त्यामुळे 15 जुलै पर्यंत ही अर्ज प्रक्रिया करता येणार आहे त्यामुळे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील आहात त्या ठिकाणी ग्रामसेवक रोजगार सेवक यांना विचारून तुम्ही योजनांविषयी माहिती मिळवून घेऊ शकता किंवा तुमच्या जिल्ह्याची ऑनलाईन पोर्टल असेल तर त्या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने सुद्धा जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या सर्व योजनांचा अर्ज तुम्हाला करता येणार आहे.
या योजनांमध्ये शेतकऱ्याला काटेरी कुंपण फवारणी पंप पाईपलाईन योजना ताडपत्री पाण्यातील मोटर ठिबक सिंचन तुषार सिंचन पाईप काही ठिकाणी झेरॉक्स मशीन शिलाई मशीन अशा विविध जिल्ह्यांमध्ये विविध प्रकारचे लाभ जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नागरिकांना दिले जाते, त्यामधील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांना आपल्या जिल्ह्यामध्ये हे अर्ज चालू आहे की नाही हाच मोठा प्रश्न पडलेला आहे त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचे दर ऑनलाईन पोर्टल असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सर्व योजनांचे अर्ज करू शकता ऑफलाइन असल्यास तुम्ही ग्रामसेवक किंवा इतर पंचायत समितीतील अधिकाऱ्यांना मिळून त्या ठिकाणी योजनांबद्दल माहिती विचारू शकता. अशाप्रकारे जिल्हा परिषद योजनांचे अर्ज 15 जुलैपर्यंत घेतले जात आहे या 15 जुलैपर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
पिक विमा काढताना कोणत्या पिकासाठी किती रक्कम भरावी लागणार? विविध पिकानुसार भरावयाची रक्कम