कांदा चाळ साठवण गृहासाठी शेतकऱ्यांना मिळणार 50 टक्के अनुदान, महाडीबीटी वर अर्ज सुरू | Kanda Chal Anudan 

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी महाडीबीटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून कांदा चाळीसाठीचे अनुदान दिले जाते, व या अनुदाना संबंधित अत्यंत महत्त्वाची बातमी असून महाडीबीटी फार्मर स्कीम पोर्टलवर कांदा चाळ अनुदानाचे अर्ज प्रक्रिया चालू झालेली आहे, त्यामुळे जर तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी असाल व या अनुदानाचा लाभ घेऊ इच्छित असाल, तर तुम्ही सुद्धा महाडीबीटी वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अगदी सहजरीत्या अनुदानासाठी अर्ज करू शकता.

 

कांदा चाळीसाठी देण्यात येणारे अनुदान साठवण क्षमतेच्या टप्प्यानुसार असेल, 500 ते 1000 टन कांदा असल्यास त्या साठी 6 हजार रुपये एवढे अनुदान मिळेल, 250 ते 500 पण पर्यंत कांदा असल्यास 8000 रुपये एवढे अनुदान मिळेल, त्याच पद्धतीने अशा प्रकारे विविध प्रकारच्या कांद्याच्या प्रमाणानुसार हे अनुदान दिले जाईल, यामध्ये वैयक्तिक शेतकरी स्वयंसहायता गट किंवा शेतकरी गट शेतकरी उत्पादक संघ महिला शेतकरी पणन संघ किंवा सहकारी संघ इत्यादींना अर्ज करता येतो.

 

अर्ज करण्यासाठी शेतकरी आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून किंवा जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन सुद्धा अर्ज करू शकतात, त्यामध्ये मोबाईलवरून करू इच्छित असाल तर सर्वप्रथम महाडीबीटी पोर्टल वर जावे, त्यानंतर शेतकऱ्याचा फार्मर आयडी टाकून व ओटीपी टाकून एंटर करा त्या ठिकाणी तुमची शंभर टक्के प्रोफाइल भरा संपूर्ण विचारलेली माहिती भरून 100% प्रोफाइल पूर्ण करा, त्यानंतर घटकासाठी अर्ज करा मध्ये जाऊन योग्य ते ऑप्शन निवडून, कांदा चाळीचे ऑप्शन निवडा व त्या ठिकाणी तुमच्या कांद्याचे प्रमाण निवडून त्या ठिकाणी विचारलेली संपूर्ण माहिती भरल्यानंतर जतन करा, वर जाऊन, अर्ज सादर करा मध्ये एंटर करा तुम्ही केलेल्या सर्व बाबी बघण्यासाठी पहा हे निळ्या अक्षरांमध्ये ऑप्शन दिले जाईल, त्यावर जाऊन संपूर्ण भरलेली माहिती पुन्हा एकदा चेक करा व पेमेंटच्या ऑप्शन दिले जाईल, पेमेंट ऑप्शन निवडून त्या ठिकाणी 23 रुपये 60 पैसे अशाप्रकारे पेमेंट करावे लागेल जर तुम्ही यापूर्वी महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरून अर्ज केलेला असेल तर तुम्हाला पेमेंट सुद्धा करावे लागणार नाही व अशाप्रकारे अत्यंत सहजरीत्या तुमचा अर्ज पूर्ण होईल.

महा डी बी टी पोर्टल: https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin

मनरेगा अंतर्गत तुमच्या गावातील कोणते व्यक्ती कोणत्या योजनांचा लाभ घेत आहे? यादी बघण्याची प्रोसेस

Leave a Comment