कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समितीतून नाफेड करणार? नितीन पवार यांची शासनाला मागणी | Kanda Kharedi Nafed 

राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन घेतले जाते, व कांद्याला हवा त्या प्रमाणामध्ये दर मिळत नाही व त्यामुळे कांद्याची खरेदी ही कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये नाफेडच्या माध्यमातून घेतली जावी, राज्यातील मंत्र्यांच्या माध्यमातून केंद्राकडे अशी मागणी केलेली आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते व त्याचप्रमाणे आता मागील उन्हाळी हंगामामध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन नाशिक जिल्ह्यामध्ये घेतलेले आहे.

 

राज्यातील विविध बाजार समितीमध्ये तब्बल 2 लाख टनापर्यंत कांद्याची आवक होताना दिसते, परंतु त्या प्रमाणात कांद्याला भाव नाही व शेतीवर केलेला सर्व खर्च हा कांद्याला मिळत असलेल्या दरापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे शेतकरी मात्र अडचणी मध्ये सापडलेला असल्याने केंद्र शासनाने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेड तसेच एसीसीएफ च्या माध्यमातून लवकरात लवकर चालू करावी अशा प्रकारची मागणी नितीन पवार यांनी केंद्राकडे केलेली आहे.

 

सध्याच्या स्थितीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला मिळत असलेला दर हा जवळपास 15000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे आहे, जर केंद्राकडे केलेली ही मागणी मान्य झाली तर शेतकऱ्यांना अर्थातच कांदा उत्पादकांना मोठा दिलासा कांद्याच्या दराबाबत तसेच सर्व बाबींमध्ये मिळू शकतो. अशा प्रकारची ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ची अत्यंत महत्त्वाची बातमी होती.

 

कर्ज फेडी संदर्भात आरबीआयचा मोठा निर्णय, आता कर्ज फेडणं झालं सोप्प 

Leave a Comment

WhatsApp Icon