महाराष्ट्र राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कंत्राटी बेसवर कामगार काम करतात, व अशावेळी कामगारांना इजा होणे त्यांचा मृत्यू होणे अशावेळी शासनाच्या माध्यमातून त्यांना काही अनुदान दिले जाते, हे अनुदान कंत्राटी कामगार योजनेच्या माध्यमातून दिले जाते, परंतु अनुदान देत असताना अनुदान मात्र खूप उशिरा सहा महिन्यांची वाट बघितल्यानंतर दिले जाते, व त्यामुळेच आता शासनाच्या माध्यमातून कंत्राटी कामगार योजना मध्ये काही बाबी समाविष्ट केलेले आहे.
कंत्राटी कामगार खाजगी कंपन्यांमध्ये काम करतात परंतु खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून काम करत असताना त्यांचा मृत्यू झालास किंवा त्यांना अपंगत्व आल्यास कोणत्याही प्रकारची जबाबदारी घेतली जात नाही, व त्यामुळे कंत्राटी कामगार योजनांच्या माध्यमातून अशा कंत्राटी बेसवर काम करणाऱ्या कामगारांना अपंग व मृत्यू झाल्यास ठराविक अशी रक्कम दिली जाते, ही रक्कम आता अगदी काही दिवसातच त्यांना उपलब्ध करून दिली जाईल अशा प्रकारचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.
कंत्राटी बेस वर काम करणाऱ्या कामगाराचा मृत्यू झाल्यास 30 लाख रुपये, कायमचे अपंगत्व आल्यास 20 लाख रुपये अनुदान, थोडेफार अपंगत्व आल्यास 10 लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे, अशा प्रकारचा शासनाने घेतलेला हा कंत्राटी बेस वर काम करणाऱ्या कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय तसेच अनुदानाचे वितरण सुद्धा अगदी एक्सीडेंट नंतर पंधरा दिवसांच्या आतच कामगाराला दिले जाईल.
कर्ज फेडी संदर्भात आरबीआयचा मोठा निर्णय, आता कर्ज फेडणं झालं सोप्प