महाराष्ट्रामधे मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते त्यामुळे कापसाचे उत्पादन घेत असताना शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की पहिली फवारणी तर झाली मग आता दुसऱ्या फवारणी मध्ये कोणते औषध वापरावी? त्याचप्रमाणे तुरीची लागवड सुद्धा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे तज्ञांच्या मते सांगितल्यात आलेली तुरीची शेंडे खुडनी त्याच पद्धतीने कापसाची दुसरी फवारणी यासंबंधी संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
कापसाची दुसरी फवारणी
ज्या शेतकऱ्यांनी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कापसाची लागवड केलेली असेल अशा कापसावर आता दुसरी फवारणी करणे आवश्यक आहे, कारण ते पिक जवळपास 40 दिवसांचे तर झालेलेच असेल, पात्या धरण्यास सुरुवात झालेली असेल त्यामुळे त्यामध्ये अळीचे थोड्या बारीक प्रमाणात प्रमाण दिसेल त्यामुळे अळी संबंधित व रस शोषक किड्यासंबंधित औषध मारणे अत्यंत गरजेचे असते.
कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या फवारणीसाठी औषध
1. रेज – 15 मिली/ओढाची एक्स्ट्रा- 30मीली प्रति पंप
2. टॉपअप – 40 मीली प्रति पंप
3. परिस स्पर्श- 20 ग्राम प्रति पंप
तुरीची शेंडे खुडणी
शेंडे खुडणीसाठी सुद्धा ठराविक कालावधी योग्य समजला जातो, त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुरीची शेंडे खुडणी कमीत कमी दोन वेळा किंवा जास्तीत जास्त तीन वेळा करणे आवश्यक आहे त्यामध्ये शेंडे खुडणीचा कालावधी 25, 50 व 75 दिवसांचा असावा. या ठराविक दिवसांच्या अंतरावर तीनही शेंडे खुडणी शेतकरी करू शकतात.