खरीप पिक विमा अर्ज 1 जुलैपासून चालू होणार | Kharip Pik Vima 

दरवर्षी मोठ्या संख्येने शेतकरी खरीप पिक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवतात, त्यामुळे यावर्षीही खरीप पिक विमा योजना संबंधित महत्वाची अपडेट म्हणजेच शेतकऱ्यांना आता यावर्षी 2025 चा खरिपाचा पिक विमा एक जुलै 2025 पासून भरता येणार आहे, त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर आपल्या शेतीला विम्याचे कवचित मिळवू इच्छित असाल तर तुम्ही सुद्धा पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवू शकता.

 

मागील वर्षी मोठ्या संख्येने खरीप हंगामात तसेच रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवलेला होता, अनेक ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली होती, व अशा स्थितीमध्ये काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली होती, त्यामुळे पीक विमा अग्रीम देण्यात आलेला होता, त्यामुळे एक प्रकारची आर्थिक मदत शेतकऱ्याला त्या परिस्थितीमध्ये मिळालेली होती परंतु यावर्षी जर शेतकऱ्याला पिक विमा भरायचा असेल तर 1 जुलैपासून पिक विमा संबंधित प्रक्रिया चालू केले जाणार आहे.

 

मागील वर्षी ज्याप्रमाणे काही सूचना देण्यात आलेल्या होत्या त्यामध्ये शेतकऱ्याच्या आधार कार्ड वरील व बँक खाते पुस्तकावरील नाव तसेच सातबारा वरील नाव यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल असल्यास तो पिक विमा शेतकऱ्याला दिला जात नव्हता परंतु शेतकऱ्यांनी आधार कार्ड अपडेट करून किंवा विविध पद्धतीने नावे दुरुस्त करून सर्व प्रक्रिया आता पूर्ण केलेले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या आधार कार्ड वरील व सातबारा वरील नाव चेक करावे, त्याच पद्धतीने शेतकऱ्याला पिक विमा भरल्यानंतर ईपीक पाहणीचा कालावधी देण्यात येईल त्या कालावधीमध्ये शेतकऱ्याला ई पीक पाहणी करणे बंधनकारक असणार आहे.

Leave a Comment