घरबसल्या रेशन कार्ड ची केवायसी करा, केवायसी प्रक्रिया संपूर्ण प्रोसेस | KYC Proses 

Aapla shetkari

घरबसल्या रेशन कार्ड ची केवायसी करा, केवायसी प्रक्रिया संपूर्ण प्रोसेस | KYC Proses 

KYC Proses, केवायसी प्रक्रिया संपूर्ण प्रोसेस, राशन कार्ड kyc कशी करायची, राशन कार्ड kyc कशी करायची मोबाईल वर, रेशन कार्ड e kyc

देशामध्ये मोठ्या प्रमाणात रेशन कार्ड धारक नागरिक आहेत अशा रेशन कार्ड धारक नागरिकांना रास्त भावांमध्ये धान्याचे वितरण केले जाते, व दिवसेंदिवस सर्व ठिकाणी विविध प्रकारच्या सुविधा शासनाच्या माध्यमातून चालू करण्यात येत असल्याने रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी पुढे आलेली आहे, मागील अनेक दिवसांपासून रेशन कार्ड धारक नागरिकांचे रेशन कार्ड सोबत आधार प्रामाणिकरण करणे म्हणजेच अर्थातच केवायसी प्रक्रिया करणे चालू झालेले होते, त्यात अनेक रेशन कार्डधारक नागरिकांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, परंतु जे नागरिक अजूनही ई केवायसी पासून वंचित आहे अशांना केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास रेशन धान्य मिळणे बंद होणार आहे.

 

मागील काही दिवसांपूर्वी शासनाच्या माध्यमातून कार्यक्रम राबवून रेशन धान्य दुकानदाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात केवायसी प्रक्रिया रेशन कार्ड धारक नागरिकांची पूर्ण केलेली होती, त्याच पद्धतीने आताही ही प्रक्रिया उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही जर अजूनही केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर ही तुम्हाला पूर्ण करता येणार आहे, यामध्ये अनेक नागरिक घरापासून दूर राहतात अशांसाठी ही एक पद्धत अत्यंत महत्त्वाची ठरू शकते कारण घरबसल्या मोबाईलच्या माध्यमातून केवायसी प्रक्रिया केली जाऊ शकते.

 

रेशन केवायसी प्रोसेस

 

रेशन कार्डधारक नागरिकांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईल मध्ये AadhaarFaceRD ॲप घ्यावा, त्यानंतर मेरा ई केवायसी हा ॲप घ्यावा, ॲप घेतल्यानंतर ओपन करा त्या ठिकाणी वेरिफाय लोकेशन वर जाऊन, मोबाईल नंबर प्रविष्ट करून ओटीपी एंटर करावा

 

विचारले गेलेली संपूर्ण माहिती त्या ठिकाणी भरावी. तुम्हाला फेस केवायसी करावी लागणार आहे त्यामुळे ते फेस ई केवायसी ऑप्शन निवडा, त्यामध्ये कॅमेरा ओपन होईल, त्यामध्ये डोळे चालू बंद करून त्या ठिकाणी तुमचा फेस स्कॅन केला जाईल व नंतर सबमिट करून तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल याचा तुम्हाला मेसेज किंवा त्या ठिकाणीच तुम्हाला माहिती सुद्धा पूर्ण झाल्याबद्दल मिळेल, अशा प्रकारे अत्यंत सहजरित्या फेस ई केवायसी करता येऊ शकते.

 

जिल्हा परिषद योजनांचे अर्ज चालू, तार कुंपण, पीव्हीसी पाईप, पीठ गिरणी, झेरॉक्स मशीन तसेच शिलाई मशीन यासाठी असा करा ऑलाइन अर्ज 

Leave a Comment