राज्यामध्ये माझी लाडकी बहीण योजना चालू करण्यात आलेली आहे, या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला पंधराशे रुपयांचा हप्ता महिला लाभार्थ्यांच्या खात्यावर वितरित केला जातो, व अशाच महिलांना आता जून महिन्याच्या हप्त्याची प्रतिष्ठा लागलेली आहे, मागील काही दिवसांपूर्वी मे महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आलेला असून, जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार? या करिता महिला प्रतीक्षा करत आहेत व अशातच शासनाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय लाडक्या बहिणीसाठीचा घेण्यात आलेला आहे.
लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये प्रत्येक महिन्याला दिले जाते त्यामुळे अशा महिलांना गुंतवणूक करायची असल्यास त्यांना एक प्रकारची नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मंजूरी देण्यात आलेली आहे. महिलांना विनातारण 40 हजार रुपये पर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठीची शासनाची तयारी चालू झालेली आहे, त्यामुळे आता महिलांना कोणत्या प्रकारचा व्यवसाय उद्योग किंवा काही कारणास्तव अडचण असल्यास विनातारण कर्ज चाळीस हजार रुपये पर्यंतचे मिळू शकेल.
मुंबई बँकेच्या माध्यमातून मुंबई परिसरामध्ये लाभ घेऊ ईच्छीनाऱ्या लाभार्थ्यांना एक लाख रुपये पर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाईल अशा प्रकारची संपूर्ण लाडक्या बहिणी बाबतची तयारी केली जात असल्याने जून महिन्याचा पुढील हप्ता हा 26 ते 28 या तारखेपर्यंत वितरित केला जाणार असल्याची शक्यता आहे, त्यामुळे शासनाच्या माध्यमातून अशा प्रकारच्या विविध प्रकारची निर्णयांची तयारी लाडक्या बहिणीसाठी विविध स्तरावर केली जात आहे.
बांधकाम कामगारांना मिळणार सुरक्षा किट मध्ये 10 वस्तू व Essential kit मध्ये 13 वस्तू, शासन निर्णय आला