राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यांमध्ये महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना चालू करण्यात आलेली आहे, या योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण 11 हप्त्यांचे वितरण पात्र महिलां लाभार्थ्यांच्या खात्यावर करण्यात आलेले आहे, व आता हा जून महिन्याचा हप्ता कधी येणार याची प्रतीक्षा प्रत्येक महिलेला होती, व त्यामुळे याच लाडकी बहिणी योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्यासंबंधीत अपडेट पुढे आलेले आहे आणि बहिणी योजनेचा हप्ता वितरित करण्याची तारीख ठरलेली आहे.
लाडक्या बहिणी योजनेला 30 जून रोजी 1 वर्ष होणार आहे, व त्यामुळे शासनाच्या माध्यमातून 30 जून पासून राज्यातील पात्र असलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैशाचे वितरण केले जाणार आहे, त्यामुळे तुम्हाला जर लाडक्या बहिणीच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा होती तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण शासनाच्या माध्यमातून आता 30 जून 2025 पासून लाडक्या बहिणीचा जून महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार आहे.
जून महिन्याचा लडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून 3600 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे, त्यामुळे आता लाडक्या बहिणींना 30 जून पासून जून महिन्याचा हप्ता वितरित होणे सुरू होईल. यामध्ये 30 जून ते 6 जुलै या कालावधीत राज्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यावर हा हप्ता जमा होईल. अशाप्रकारे राज्यातील सर्व लाडक्या बहिणीसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.
लाडक्या बहिणींना चालू करता येणार नागरी सहकारी पतसंस्था शासनाची मंजुरी, जून चा हप्ता येणार