राज्यातील सर्व लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, शासनाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारा जुलै महिन्याचा हप्ता यासंबंधी तारीख जाहीर करण्यात आलेली आहे, त्यामुळे तुम्ही सर जर लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र असाल तर पुढील हप्ता हा तुम्हाला कधी मिळणार? यासंबंधी संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
दर महिन्याला लाडक्या बहिणींच्या खात्यावर दीड हजार रुपयांची रक्कम शासनाच्या माध्यमातून पाठवली जाते, मागील महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यावर पाठवण्यात आलेला होता व आता जुलै महिन्याचा हप्ता बाकी असल्याने शासनाच्या माध्यमातून जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्याबाबत तारीख घोषित करण्यात आलेली आहे.
8 ऑगस्ट 2025 या तारखेपासून शासनाच्या माध्यमातून राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे वितरित केले जाणार आहे कारण 9 ऑगस्टला रक्षाबंधन हा सण असल्याने सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधन निमित्त भेट म्हणून हप्ता विपरीत केला जाणार आहे. अशा प्रकारची माहिती शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली असल्याने सर्व लाडक्या बहिणींना आता रक्षाबंधन चे एक गिफ्ट लवकरच मिळणार आहे
पीठ गिरणी, तार कुंपण यांसारख्या विविध योजनांचे नवीन अर्ज सुरू, असा करा आजच अर्ज