राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू करण्यात आलेली आहे, या योजनेच्या माध्यमातून जवळपास 11 हप्त्याचे वितरण महिलांच्या खात्यावर करण्यात आलेली आहे, महिलांना जून महिन्याचा हप्ता कधी येणार? याची प्रतिक्षा होती व अशा सर्व लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, म्हणजेच आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यावर हप्ते वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे, अशा प्रकारची माहिती, शासनाच्या माध्यमातून कळविण्यात येत आहे.
जून महिन्याचा हा येत असलेला हप्ता 12 वा हप्ता आहे म्हणजेच एकूण एक वर्ष मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला पूर्ण झालेले आहे त्यामुळे तुम्ही जर माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असाल तर तुम्हाला सुद्धा हप्ता आला किंवा नाही हे चेक करा कारण लाडक्या बहिणीच्या खात्यावर जून महिन्याचा हप्ता वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे.
अदिती तटकरे यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीमध्ये सांगितलेले आहे की आज पासुन राज्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या आधार लिंक असलेल्या खात्यात हप्ता वितरित केले जात आहे. अशाप्रकारे तुम्ही तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असाल व तुम्हाला जर यापूर्वीच्या हप्ते मिळालेले असेल तर तुमचा हप्ता आला की नाही हे तुम्ही चेक करू शकता कारण हप्ता वितरणाची प्रक्रिया चालू झालेली आहे.
या महिलांचे लाडकी बहिणी योजना चे 1500 रुपये होणार बंद? जाणून घ्या कोणत्या आहेत त्या महिला