लाडक्या बहिणीचा बारावा हप्ता राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेला आहे, परंतु राज्यातील अशा अनेक लाडक्या बहिणी आहेत की, त्यांच्या खात्यावर हप्ता जमा झालेला नाही, त्या महिला अत्यंत सहजपणे आपल्या हप्ता न आल्या बाबतची तक्रार करू शकतात, व त्यांचा हप्ता सुद्धा चालू होऊ शकतो, त्यामुळे नेमकी प्रोसेस काय आहे? कशा पद्धतीने सर्व प्रक्रिया पूर्ण करायची? याबाबत संपूर्ण माहिती खालील प्रमाणे जाणून घेऊयात.
तक्रार प्रक्रिया ऑनलाईन प्रोसेस
- सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळ ओपन करा, त्या ठिकाणी सर्वात वर डाव्या कोपऱ्यामध्ये हेल्पलाइन नंबर दिसेल त्यामध्ये कॉल करून तुम्ही सर्व माहिती मिळू शकतात.
- त्यानंतर अर्जदार लॉगीन हे बटन निवडून, मोबाईल नंबर, पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला तक्रार हे ऑप्शन दाखवले जाईल ते तक्रार ऑप्शन निवडा.
- त्या ठिकाणी ऍड ग्रीव्हियन्स ऑपशन निवडून त्या ठिकाणी कंप्लेंट श्रेणी मध्ये Other हा ऑप्शन निवडा, लाडक्या बहिणीचा फॉर्म भरल्यानंतर जो क्रमांक मिळालेला असेल तो क्रमांक एंटर करा.
- त्यानंतर नाव, गाव, पत्ता, जिल्हा, तालुका सर्व ऑप्शन योग्य प्रकारे भरा. तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणचा पिनकोड व मतदार संघ निवडा.
- वर्णन करा हे ऑप्शन दिसेल, त्यामध्ये तुमची तक्रार काय आहे? ते टाका,(मी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व अटींमध्ये पात्र आहे तरीसुद्धा माझा हप्ता जमा झालेला नाही त्यामुळे लवकर माझ्या तक्रारीचे निवारण करावे) हमसफर तुम्ही ऍड करू शकता किंवा तुम्ही स्वतःच्या मनाने सुद्धा मजकूर टाकू शकता.
- तुझ्याकडे काही कागदपत्र असतील तर अपलोड करा अन्यथा नाही केली तरी चालेल, व त्या ठिकाणी कॅपच्या कोड दाखवला जाईल, तो कॅप्चा कोड जशास तसा बॉक्समध्ये एंटर करून अर्ज सबमिट करा.
- तुम्ही भरलेली माहिती योग्य आहे? ती तुम्हाला सबमिट करायचे आहे का? त्यानंतर तुम्ही हो निवडून कन्फर्म करून असं जमा होईल अशाप्रकारे लाडक्या बहिणींना तक्रार करता येणार आहे.
- अधिकृत संकेतस्थळावर येऊन तुम्ही तक्रारीचे स्टेटस पुन्हा-पुन्हा चेक करू शकता, त्या ठिकाणी तुमच्या तक्रारीचे निवारण केल्यानंतर त्यामध्ये प्रॉब्लेम किंवा इतर प्रकारचे सर्व ऑप्शन दाखवले जाईल.
तुकडे बंदी कायदा शिथील करण्याचा शासनाचा मोठा निर्णय, लहान तुकड्यातील जमीन खरेदी विक्री करता येणार