राज्यामध्ये माझी लाडकी बहीण योजना राबवली जाते, या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला दीड हजार रुपये महिलांच्या खात्यावर पाठवले जातात, या योजनेच्या माध्यमातून राज्यातील मोठ्या संख्येने महिला पात्र ठरलेल्या आहेत, व योजनेचा 12वा हप्ता, राज्यातील लाडक्या बहिणीच्या खात्यावर हप्ता वितरीत करण्यात आलेला आहे, परंतु अशा अनेक लाडक्या बहिणी आहेत की, ज्यांच्या खात्यावर हा हफ्ता जमा झालेला नाही, त्यामुळे हप्ता जमा न होण्यामागचे नेमके कारण काय? हेच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
लाडकी बहिण योजनेला एक वर्ष पूर्ण झालेले आहेत, एकूण बारा हप्त्यांचे वितरण लाडक्या बहिणीच्या खात्यावर करण्यात आलेले आहे, परंतु लाडकी बहीण योजना चालू करत असताना शासनाच्या माध्यमातून यामध्ये काही अटी व शर्ती ठेवण्यात आलेल्या होत्या, त्या अटी व शर्ती मध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरत नाही अशांना आता वगळले जात आहे.
हप्ता न येण्यामागची कारणे
- ज्या कुटुंबातील महिलेचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल अशा महिला व अपात्र ठरविल्या जात आहे.
- ज्या लाडक्या बहिणीच्या कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरत असतील, अशा लाडक्या बहिणींना योजनेतून वगळले जात आहे.
- या लाडक्या बहिणीच्या कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असेल तसेच इतर प्रकारच्या विविध सरकारी नोकऱ्यांमध्ये असणाऱ्या नागरिकांच्या कुटुंबातील महिलेला अपात्र केलेले आहे.
- शासनाच्या माध्यमातून असलेल्या इतर योजनांचा लाभ घेत असलेल्या लाडक्या बहिणी योजने अंतर्गत अपात्र ठरतील.
- ज्या कुटुंबातील सदस्य खासदार किंवा आमदार आहेत तसेच भारत सरकारच्या उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष असतील, तर अशा कुटुंबातील महिला सुद्धा लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र आहे.
- ज्या कुटुंबाच्या नावे 4 चाकी वाहन आहे, अशा कुटुंबातील महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र नाहीत.
- अशाप्रकारे लाडक्या बहिणींचा हप्ता आलेला नसेल, तर अशा बहिणींना हप्ता न येण्यामागचे वरील काही कारणे आहेत.
लाडक्या बहिणींचा हप्ता आला नसेल तर लगेच तक्रार करा, ऑनलाइन तक्रार प्रोसेस