लाडकी बहीण योजना जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार? लाडक्या बहिणींना लवकरच पुढील हप्ता | Ladki Bahin Yojana June Installment

Aapla shetkari

लाडकी बहीण योजना जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार? लाडक्या बहिणींना लवकरच पुढील हप्ता | Ladki Bahin Yojana June Installment

2100 रुपयांचा हप्ता कधी चालू केला जाणार, Ladki Bahin Yojana June Installment, लाडकी बहीण योजना 2025, लाडकी बहीण योजना पैसे कधी मिळणार

महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण योजना चालू करण्यात आलेली असून, या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना आतापर्यंत 11 हप्त्यांचे वितरण करण्यात आलेले आहे, व मे महिन्याचा हप्ता वितरित केल्यानंतर लाडक्या बहिणींना आता जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा लागलेली आहे, त्यामुळेच जून महिन्याचा हप्ता लगेच मिळणार का? शासनाने याबद्दल माहिती दिलेली आहेत का? तसेच संपूर्ण माहिती खालील प्रमाणे जाणून घेण्याचा प्रयत्न या लेखातून करणार आहोत.

 

जून महिन्याच्या हप्त्याबाबत लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे, कारण मार्च महिन्यामध्ये तीन ते चार दिवसाच्या कालावधीमध्ये दोन्हीही महिन्याची हप्ते वितरी झालेले असल्याने आता मे महिना गेलेला असताना जून महिन्यात मे महिन्याचा हप्ता इतरित केलेला आहे, त्यामुळे जून महिना सुद्धा चालू झालेला असल्याने जून महिन्याचा हप्ता सुद्धा दोन-तीन दिवसात येणार का, असा प्रश्न लाडक्या बहिणीच्या माध्यमातून विचारला जात आहे, परंतु शक्यतो याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही व जून महिन्याचा हप्ता जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दिल्या जाणार असल्याची शक्यता आहे, त्यामुळे जूनचा हप्ता हा येत्या आठ दिवसात मिळणार की नाही याबाबत कोणतीही खरी माहिती नाही.

 

लाडक्या बहिणीच्या माध्यमातून वारंवार विचारला जाणारा प्रश्न म्हणजेच 2100 रुपयांचा हप्ता कधी चालू केला जाणार, शासनाच्या माध्यमातून बोलत असताना सांगण्यात आलेले होते की योग्य वेळेला एकशे रुपयाचा हप्ता चालू केला जाणार, परंतु आत्तापर्यंत याबाबत कोणताही निर्णय किंवा कोणतीही माहिती शासनाने 2100 रुपयांच्या हप्ता चालू करण्याबाबत दिलेली नाही त्यामुळे लाडक्या बहिणींना मिळणारा पुढील हप्ता सुद्धा पंधराशे रुपयांचा असू शकणार आहे, अशाप्रकारे लाडक्या बहिनींना जून महिन्याचा हप्ता यांच्या शेवटच्या आठवड्यात मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

घरकुल यादी 2025 जाहीर, आता मोबाइल वर बघता येणार, पहा संपूर्ण प्रोसेस 

Leave a Comment