महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना चालू करण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला महिलांच्या खात्यावर 1500 रुपये एवढी रक्कम पाठवली जाते, व राज्यातील बहुतांश महिला या लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून पात्र आहे व या योजनेचा लाभही घेत आहे, परंतु शासनाच्या माध्यमातून योजनेमध्ये पारदर्शकता निर्माण व्हावी यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक केलेले आहे.
लाडकी बहिण योजनेची केवायसी प्रक्रिया चालू झालेली असून, बहुतांश महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, परंतु अनेक महिलांना काही अडचणी भासत असल्याने त्यांची केवायसी प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही, अशाच महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून शासनाच्या माध्यमातून केवायसी करण्याची शेवटची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे व 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत राज्यातील सर्व लाडक्या बहिणीने केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी अशी आवाहन केले जात आहे.
त्याच पद्धतीने ज्या महिलांना केवायसी करताना ओटीपी चा किंवा पती व वडील दोघेही नसणे या संबंधित काही महत्त्वाच्या बाबींसाठी सुद्धा लवकरच तोडगा काढला जाणार आहे, त्यामुळे राज्यातील सर्व लाडक्या बहिनींना 18 नोव्हेंबर पर्यंत केवायसी करण्याची मुदत देण्यात आलेली आहे.
पोकरा योजनेत तुमचे गाव आहे का? सर्व गावांची यादी एका मिनिटात मोबाईलवर बघण्याची संपूर्ण प्रोसेस



