मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, पात्रता निकष, अनुदान, अर्ज प्रक्रिया | Magel Tyala Saur Krushi Pamp 

Aapla shetkari

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, पात्रता निकष, अनुदान, अर्ज प्रक्रिया | Magel Tyala Saur Krushi Pamp 

Magel Tyala Saur Krushi Pamp, अनुदान, अर्ज प्रक्रिया | Magel Tyala Saur Krushi Pamp, पात्रता निकष, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना

राज्यामध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप योजना चालू करण्यात आलेली आहे, या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाचा लाभ दिला जात आहे, योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किती अनुदान मिळते? त्याच पद्धतीने शेतकऱ्यांना किती रुपये रक्कम भरावी लागणार आहे? व शेतकऱ्यांची वैयक्तिक पात्रता तसेच अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने शेतकरी करू शकतात अशी संपूर्ण मागेल त्याला सौर कृषी पंप योजने संबंधित माहिती खालील प्रमाणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.

 

सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वीज पुरवठ्या शिवाय पाण्याची उपलब्धता होणार, सौर कृषी पंपाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात जमीन ओलिताची करता येईल. विजेची बचत व बिलाची बचत सुद्धा या सर्व कृषी पंप योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होऊ शकते, त्यामुळे शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप देण्याचे ठरवलेले आहे.

 

या शेतकऱ्यांना एवढ्या HP चा पंप

 

ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकरापेक्षा जास्त शेती असेल अशा शेतकऱ्यांना 7.5 एचपी चा पंप दिला जाईल. 2.5 ते 5 एकर पर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना 5 HP क्षमतेचा पंप, 2 5 एकरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना 3 HP क्षमतेचा पंप दिला जाईल.

 

व जात प्रवर्गानुसार सुद्धा यामध्ये अनुदान असेल, अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांना 5 टक्के एवढी रक्कम भरावी लागेल, उर्वरित रक्कम शासन भरेल, सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना 10 टक्के एवढी रक्कम भरावी लागेल, अशा प्रकारचे अनुदान दिले जाईल.

 

अर्ज कसा करावा?

 

मागेल त्याला सौर कृषी पंपासाठी शेतकऱ्यांना महावितरणच्या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे, ही प्रक्रिया अत्यंत सहज व सोपी असून लॉगिन करून संपूर्ण माहिती भरून कागदपत्रे अपलोड करून शेतकऱ्याला अर्ज सबमिट करावा लागेल, कागदपत्रांमध्ये सातबारा उतारा, शेतकऱ्याचे ना हरकत पत्र स्टॅम्पवर अशी कागदपत्रे शेतकऱ्याला अपलोड करावी लागेल, व सबमिट अर्ज केल्यानंतर शेतकऱ्याची निवड केली जाईल शेतकऱ्याची निवड झाल्याबद्दल तुम्ही ज्या कॅटेगिरीतील आहात त्या कॅटेगिरी नुसार तुम्हाला तेवढी रक्कम भरावी लागेल व तुम्हाला सौर कृषी पंपाचा लाभ दिला जाईल.

 

नमो शेतकरी व पी एम किसान योजना पुढील हप्ता कधी येणार? महत्वाच अपडेट, या तारखेला येणार?

Leave a Comment

WhatsApp Icon