महाडीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात, त्यामध्ये अगदी तुषार सिंचन पासून ते ठिबक सिंचन पर्यंत व टोकन यंत्रापासून तर तार कुंपणपर्यंत अशा सर्व योजना महाडीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी राबवल्या जातात, व या योजनेस संबंधित शेतकऱ्यांना माहिती नसल्याने त्यांना गैरसमज झालेला आहे की या योजनांचे अर्ज स्वतः मोबाईलच्या माध्यमातून भरले जात नाही, तर असे नाहीये, शेतकऱ्यांना मोबाईल वरून लॉगिन करून सर्व प्रकारचे अर्ज भरता येतात व त्याची संपूर्ण प्रोसेस आपण जाणून घेऊयात.
शेतकरी लॉगिन प्रोसेस
महाडीबीटी पोर्टल च्या माध्यमातून अर्ज करण्यापूर्वी लॉगिन प्रक्रिया पूर्ण करावी लागते, त्यासाठी महाडीबीटी फार्मर हे पोर्टल ओपन करा, शेतकऱ्यांना आपला फार्मर आयडी टाकून त्या ठिकाणी ओटीपी पाठवून ओटीपी बॉक्समध्ये एंटर करून सबमिट करा व त्यानंतर तुमची लॉगिन प्रक्रिया पूर्ण होईल.
महाडीबीटीच्या योजनांची अर्ज प्रक्रिया
- अर्ज प्रक्रिया करण्यासाठी लॉगिन करून त्या ठिकाणी घटकासाठी अर्ज करा हे ऑप्शन दिसेल घटकासाठी अर्ज करा हे ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला विविध प्रकारचे रखाने दाखवले जाईल, व प्रत्येक राखण्यामध्ये शेतीविषयक विविध प्रकारच्या योजनांसाठी अर्ज करता येऊ शकतो, तुम्हाला कोणता अर्ज करायचा आहे, त्यामधील जाऊन शेतीविषयक संपूर्ण माहिती विचारली जाईल.
- उदाहरण घ्यायचे झाल्यास तर आपल्याला ठिबक विषयीची अर्ज भरायचा असेल तर तुमच्या शेतीविषयक संपूर्ण माहिती, त्यात किती एकर शेती आहे, ठिबक किती बाय किती साठी हवा आहे त्याच पद्धतीने तुमची जमिनीची एकूण क्षेत्र तुमच्या जमिनीचा गट क्रमांक ही सर्व माहिती भरावी.
- माहिती भरल्यानंतर माहिती सेव करून घ्या त्यानंतर होम पेजवर येऊन अर्ज सादर करा हे ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन मध्ये जाऊन तुम्हाला तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती बघता येईल, माहिती बघितल्यानंतर अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला 23 रुपये 60 पैसे एवढे पेमेंट करावे लागेल, पेमेंट ऑनलाईन पद्धतीने केल्यानंतर अर्ज सबमिट होईल व या संबंधित तुम्हाला मेसेज सुद्धा येईल.
- अशाप्रकारे संपूर्ण महाडीबीटी पोर्टलवर योजनांची अर्ज करण्याची एकच प्रोसेस आहे व या प्रोसेस नुसार सर्व प्रकारच्या योजनांचे अर्ज केले जाऊ शकते.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, पात्रता निकष, अनुदान, अर्ज प्रक्रिया