महाराष्ट्रातील या भागात सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडणार हवामान खात्याची माहिती | monsoon 

महाराष्ट्र राज्य सह देशातील विविध भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, आय एम डी च्या माध्यमातून देशातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात यावर्षी पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला असून, महाराष्ट्रात सुद्धा सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचे सांगितले, देशभरामध्ये जवळपास १०६% एवढा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली असून, वर्तवण्यात आलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार मध्य व दक्षिण भारतामध्ये सामान्य पेक्षा जास्त पाऊस असण्याची शक्यता आहे, म्हणजेच सरासरी 106 टक्के पर्यंत ही शक्यता जाईल.

 

वायव्य भारतामध्ये सामान्य पेक्षा कमी तर ईशान्य भारतामध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार सामान्य पेक्षा अतिशय कमी पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. छत्तीसगड महाराष्ट्र ओडिसा मध्य प्रदेश या राज्यांमध्ये 106 ते 108 टक्क्यापर्यंतचा पाऊस पडू शकतो. 24 मे रोजी केरळ मध्ये मान्सून पोहोचलेला आहे, सर्वसामान्य वेळेपेक्षा लवकरच मान्सून यावर्षी केरळमध्ये दाखल झालेला आहे. अरबी समुद्रातील पावसाची स्थिती ही सक्रिय असून मान्सून भारतात दाखल झाल्याची माहिती देण्यात आलेली आहे.

 

महाराष्ट्र व ओडिसा या दोन राज्यांमध्ये सामान्य पेक्षा थोडा जास्तच पाऊस असण्याची शक्यता देण्यात आलेली आहे, त्याच पद्धतीने या दोन राज्यांमध्ये तसेच आजूबाजूच्या प्रदेशात म्हणजेच मध्य प्रदेश अशा राज्यांमध्ये पुर परिस्थिती सुद्धा उद्भवली जाऊ शकणार आहे, जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यांमध्ये पडणारा पाऊस जास्त राहणार आहे, अशाप्रकारे आयएमडीने दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्र, ओरिसा, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज दिलेला असून देशातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो.

Leave a Comment

WhatsApp Icon