महाराष्ट्रातील या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता, तर काही जिल्ह्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस | Monsoon Maharashtra 

Aapla shetkari

महाराष्ट्रातील या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता, तर काही जिल्ह्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस | Monsoon Maharashtra 

तर काही जिल्ह्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस, महाराष्ट्रातील या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता, मान्सून हवामान अंदाज 2025, हवामान अंदाज

राज्यातील विविध भागांमध्ये भाग बदलत मध्यम स्वरूपाच्या पावसाने सुरुवात केलेली आहे, त्यामध्ये महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडतो आहे, तर काही ठिकाणी अजूनही पावसाने हजेरी लावलेली नाही, व मान्सूनची वाटचाल काय आहे मान्सून कधी येणार? सक्रिय स्थिती आहे की नाही अशी संपूर्ण माहिती शेतकऱ्यांनी जाणून घ्यावी, व त्याशिवाय कोणत्याही प्रकारच्या पेरणीचा निर्णय घेऊ नये कारण मान्सून सक्रिय झाल्याशिवाय अवकाळी पावसाची कोणतीही गॅरेंटी नसल्याने शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगून लावगणीचा निर्णय घ्यावा.

 

अभ्यासकांच्या मते देण्यात येत असलेल्या अंदाजानुसार अरबी समुद्र तसेच हिंदी महासागरामध्ये तापमान वाढलेले असून, त्यामुळे बाष्पीभवनाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात होत असल्याने, पाण्याचे ढग तयार होत चाललेले आहे, त्याचप्रमाणे दक्षिण गोलार्धापासून अरबी समुद्राच्या दिशेने उत्तर गोलार्धाकडून ढग येत असल्याची माहिती देण्यात आलेली आहे, त्यामुळे चांगल्या प्रमाणात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याने देशातील विविध भागांमध्ये हलक्यातील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे.

 

त्याचप्रमाणे राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे, विदर्भामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, त्याच पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, कोल्हापूर, सातारा या भागात थोडा जास्त म्हणजेच मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, सांगली, अहिल्यानगर या जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल. त्याच पद्धतीने उर्वरित राज्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण राहणार असल्याचे व्यक्त केलेले आहे. अशाप्रकारे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याने अर्थातच लवकरच राज्यातील सर्व भागांमध्ये पाऊस येईल.

 

मोटरसायकलवर हेल्मेट न वापरणे, सिग्नल तोडणे तसेच इतर बाबींसाठी भरावा लागणार मोठा दंड, शासनाचे नवीन नियम

Leave a Comment

WhatsApp Icon