सुशिक्षित बेरोजगारांसाठी नाविन्यपूर्ण योजना राबवली जाते, या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात अर्ज केलेले होते व पात्र झालेल्या लाभार्थ्यांना मोबाईलवर मेसेज कळविण्यात आलेला होता व त्यानुसार त्यांनी कागदपत्रे सुद्धा आतापर्यंत अपलोड केलेली आहे, व त्यामुळे नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व लाभार्थ्यांची कागदपत्रे परताळणी चालू झालेली आहे, याकरताने दरम्यान काही कागदपत्रे क्लियर नसणे किंवा चुकीची कागदपत्रे अपलोड करणे अशा विविध कारणांनी कागदपत्रांमध्ये काही अडचणी येत आहेत व त्यामुळे आता त्यांना पुन्हा एकदा कागदपत्रे अपलोड करावे लागणार.
ज्या लाभार्थ्यांच्या कागदपत्रांमध्ये कोणत्या प्रकारची त्रुटी किंवा काही अडचणी आल्यास अशा लाभार्थ्यांना आता मोबाईल वरून मेसेजच्या द्वारे कळविण्यात येईल व तुम्हाला कोणती कागदपत्रे पुन्हा अपलोड करावे लागणार या संबंधित माहिती दिली जाईल, त्यानंतर लाभार्थ्यांना 1 जुलैपासून पोर्टल ओपन होऊन 3 जुलै पर्यंत हे सर्व कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने अपलोड करावे लागणार आहे, परंतु तीन जुलै नंतर मात्र अपलोड करता येणार नाही त्यामुळे ही महत्त्वाची बाब लाभार्थ्यांनी लक्षात घ्यावी.
नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत तुम्ही जर पात्र असाल व तुम्ही कागदपत्रे अपलोड केलेली असेल व त्यामध्ये मेसेज आल्यानंतर त्या प्रकारची कागदपत्रे तुम्हाला वेळेवर अपलोड करावी लागणार आहे, अशा प्रकारे नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांच्या कागदपत्रे संबंधित अत्यंत महत्त्वाची अपडेट असून तीन जुलै पर्यंत म्हणजेच एक जुलै ते 3 जुलै पर्यंत पोर्टल कागदपत्र अपलोड करण्यासाठी ओपन होणार आहे.
FARMER ID शोधा फक्त 2 मिनिटात, मोबाइल द्वारे, संपुर्ण योजनांचा लाभ मिळवण्यास farmer ID आवश्यक