2024 मधिल पिक विमा शेतकऱ्यांना मिळणार, 1028 कोटींचा निधी वितरीत | Pik Vima Shetkari 

राज्यामध्ये 2024 च्या हंगामामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवलेला होता, 2024 मध्ये 1 रुपयात पिक विमा योजना राबवली गेली होती, व यामध्ये एकूण नऊ कंपन्यांचा समावेश होता, व शासनाच्या माध्यमातून कंपन्यांना हप्ता वितरित करण्यात आलेला नसल्याने, शेतकऱ्यांना पिक विमा देण्यात येत नव्हता, व याच अडचणीमुळे शेतकऱ्यांचा पिक विमा अडकलेला होता, व अशाच पीक विमा संबंधित अत्यंत महत्त्वाची बातमी पुढे आलेली आहे.

 

शासनाच्या माध्यमातून तब्बल 1 हजार कोटी रुपयांचा पिक विम्याचा हप्ता एकूण नऊ पीक विमा कंपन्यांना दिला जाणार आहे यामध्ये 132 कोटी रुपये पिक विमा कंपनीकडून शासनाला देणे बाकी असल्याने ती रक्कम व गळून उर्वरित असलेली सर्व रक्कम नऊ पिक विमा कंपन्यांच्या नावाने वितरित केली जाणार आहे, पिक विमाचे वितरण थकित असल्याने ते सर्व पिक विमा शेतकऱ्यांच्या नावाने सुद्धा पाठवला जाणार आहे.

 

खरीप हंगाम 2024 मधील शेतकऱ्यांना वितरित करण्याचा एकूण 400 कोटी रुपयांच्या पिक विमा वितरीत करणे बाकी असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली होती, व त्यामुळे शासनाच्या माध्यमातून पिक विमा कंपन्यांना हप्ता वितरणानंतर, शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पीक विम्याचे वितरण केले जाईल. एकूण नऊ पीक विमा कंपन्यांना शासनाच्या माध्यमातून हप्ता वितरण केले जाईल, अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून, उर्वरित असलेला पिक विमा शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.

 

MahaDBT अंतर्गत शेतकरी लॉगिन प्रोसेस, ठिबक सिंचन सह पाईपलाईन अनुदान योजनांची अर्ज प्रक्रिया मोबाइल वरून

Leave a Comment

WhatsApp Icon