पिक विमा योजने संबंधित जीआर जाहीर करण्यात आलेला आहे व शेतकऱ्यांसाठी ची महत्वाची बाब म्हणजेच एक रुपयात पीक विमा योजना महाराष्ट्र मध्ये राबविण्यात येत होती, ती आता 2025 26 च्या हंगामापासून बंद झालेली आहे, त्यामुळे 2025 26 या हंगामासाठी सुधारित पीक विमा योजना राबवली जाणार असल्याचा जीआर काढण्यात आलेला आहे, यामधील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांना किती पैसे भरून पिक विमा काढावा लागेल त्याच पद्धतीने शेतकऱ्यांना क्लेम करावा लागणार की नाही व अशी संपूर्ण माहिती खालील प्रमाणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
पिक विमा योजनेची अर्ज प्रक्रिया एक जुलै 2025 पासून चालू होणार आहे, तर ती अर्ज प्रक्रिया शेतकऱ्यांना 31 जुलै 2025 पर्यंत पूर्ण करता येणार आहे, यामधील महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांना आता एक रुपयात पिक विमा भरता येणार नाही, तर ठराविक पिकासाठी जी टक्केवारी ठरवली जाईल त्या टक्केवारीनुसार विविध प्रकारचे पिकासाठी विविध प्रकारच्या टक्केवारीनुसार शेतकऱ्यांना पैसे भरून पिक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदविता येणार आहे.
खरीप हंगामासाठी पीक पेरणी पासून पीक कापणी पर्यंत म्हणजेच पेरणी न होणे, दुबार पेरणीचे संकट यांचा यामध्ये समावेश होईल यामध्ये पीक कापणी प्रयोगाद्वारे 50 टक्के व तांत्रिक उत्पादन आधारे 50% अशा पद्धतीची सर्व बाबींची बेरीज करून एवरेज काढून पिक विम्याची नुकसान भरपाई दिली जाईल. अर्थातच पीक कापणीच्या अहवालानुसार पिक विमा दिला जाईल. अशा प्रकारे 2025-26 या हंगामासाठी सुधारित पीक विमा योजनेचा जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे.
महाडीबीटी मध्ये असलेल्या सर्व योजनांची यादी, मोबाईल वरून करा सर्व योजनांसाठीचे अर्ज