रब्बी पीक विमा वाटप सुरू, तुमचा पिक विमा मंजूर आहे का? चेक करण्याची प्रोसेस | Pik Vima Yojana 

Aapla shetkari

रब्बी पीक विमा वाटप सुरू, तुमचा पिक विमा मंजूर आहे का? चेक करण्याची प्रोसेस | Pik Vima Yojana 

Pik Vima Yojana, चेक करण्याची प्रोसेस, तुमचा पिक विमा मंजूर आहे का?, रब्बी पीक विमा वाटप सुरू

पिक विमा कंपनीच्या माध्यमातून रब्बी पिक विमा वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे, त्यामुळे तुम्ही जर रब्बी हंगामामध्ये पिक विमा काढलेला असेल व तुम्ही क्लेम केलेला असेल व तुमचा क्लेम मंजूर झालेला असेल, तर तुम्हाला सुद्धा हा पिक विमा मिळू शकतो, पिक विमा वाटप चालू झालेला असल्याने तुमच्या नावावर पिक विमा येणार का? हे ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे जाणून घ्यायची संपूर्ण प्रोसेस खालील प्रमाणे करून घेऊयात.

 

तुमचा पिक विमा मंजूर का चेक करण्याची प्रोसेस?

 

रब्बी हंगामामध्ये हरभरा कांदा अशा प्रकारच्या पिकांचे नुकसान झालेले होते व अशा परिस्थितीमध्ये अनेक शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते व ज्या शेतकऱ्यांचे क्लेम मंजूर झालेले आहे, अशांना आता विमा वाटप चालू झालेला आहे, तुम्हाला पिक विमा मंजूर आहे का? हे चेक करण्यासाठी सर्वप्रथम PMFBY पोर्टलवर यावे लागेल त्या ठिकाणी तुम्हाला फार्मर कॉर्नर हे ऑप्शन निवडायचे आहे.

 

त्यामुळे तुम्हाला मोबाईल नंबर व आधार नंबर टाकून ओटीपी पाठवून कॅपच्या कोड एंटर करून लॉगिन करून घ्यायचे आहे, यामध्ये आपण रब्बी 2024 संबंधी जाणून घेऊया, रब्बी हंगाम 2024 ऑप्शन निवडा त्या ठिकाणी तुमच्यासमोर एक संपूर्ण माहितीचा बॉक्स ओपन होईल, त्यामध्ये तुमच्या क्लेमची माहिती तुमचा क्लेम मंजूर झालेला आहे का हे संपूर्ण माहिती दाखवली जाईल. त्या ठिकाणी किती रक्कम मंजूर झालेली आहे? व मंजूर झालेली रक्कम सुद्धा त्याच पद्धतीने शेतकऱ्यांनाही रक्कम देण्यात आलेली आहे का? अशी संपूर्ण माहिती त्या ठिकाणी दाखवली जाईल.

पिक विमा चेक करण्याची लिंक : https://pmfby.gov.in/farmerLogin

एवढेच नव्हे तर त्या ठिकाणी तुम्ही खरीप हंगामातील संपूर्ण पिक विमा संबंधित क्लेम स्थिती किंवा संपूर्ण माहिती अशी तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता व 2023 या वर्षाची सुद्धा माहिती त्या ठिकाणी दाखवली जाईल अशा प्रकारे तुम्हाला ज्या वर्षाची माहिती हवी असेल त्या वर्षाची माहिती तुम्ही PMFBY च्या पोर्टलवरून वरील प्रमाणे अत्यंत साजरीत्या चेक करू शकता.

 

राज्यामध्ये सुधारित पीक विमा योजना लागू, कसा मिळणार पिक विमा? 

Leave a Comment

WhatsApp Icon