राज्यांमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये केंद्र वरती अर्थसंकल्प अंतर्गत विविध प्रकारच्या अनुदानावर योजना राबवल्या जातात त्यामध्ये 100% अनुदानावर काटेरी तार कुंपण त्याच पद्धतीने पीठ गिरणी व शिलाई मशीन सह विविध प्रकारच्या योजना लाभ विविध जिल्ह्यांमध्ये दिला जातो, व या संबंधित अर्ज प्रक्रिया चालू झालेली असून तुमच्या जिल्ह्यामध्ये अर्ज प्रक्रिया चालू झालेली आहे की नाही? व झाली असेल तर अर्ज कसा कराव? कोणत्या ठिकाणी करावा या संबंधित संपूर्ण माहिती खालील प्रमाणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
या सर्व योजनांचा लाभ कोणाला मिळणार?
पीठ गिरणी, शिलाई मशीन, तार कुंपण, विद्यार्थ्यांना लॅपटॉप, प्रशिक्षण, ब्युटी पार्लर प्रशिक्षण, मिनी दाल मिल एवढेच नव्हे तर विविध जिल्ह्यांमध्ये विविध प्रकारच्या योजनांचा समावेश करण्यात आलेला आहे, विविध बाबींसाठी चा लाभ घ्यायचा असल्यास यासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदार पात्र ठरणार आहे त्याच पद्धतीने 31 जुलै 2025 पर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
तुमच्या जिल्ह्यात अर्ज सुरू आहे की नाही? असे चेक करा
जिल्ह्यामध्ये विविध बाबींसाठीचे अर्ज सुरू झालेले असून तुमच्या जिल्ह्यामध्ये अर्ज सुरू झालेली आहे की नाही, हे चेक करण्यासाठी सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअर वर जाऊन त्या ठिकाणी सर्च मध्ये nbtribal या संकेतस्थळाला सर्च करून ओपन करा त्या ठिकाणी तुम्ही पिओ निहाय योजना या ऑप्शनला निवडून, तुमचं प्रकल्प कार्यालय निवडून त्या ठिकाणी राबवल्या येत असलेल्या सर्व योजनांची यादी ओपन होईल.
तुम्हाला योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अधिकृत संकेतस्थळावरच अर्जदाराची सर्वप्रथम नोंदणी करावी लागेल त्यानंतर अर्ज करा हे ऑप्शन निवडून त्यामध्ये विचारलेले संपूर्ण माहिती भरावी लागेल त्यामध्ये गाव, पत्ता, पॅन कार्ड नंबर, आधार कार्ड नंबर, रहिवासी , याची माहिती, शिक्षण त्याच पद्धतीने विविध प्रकारची माहिती भरावी लागेल, व अशाप्रकारे तुमची नोंदणी पूर्ण होईल त्यानंतर लॉगिन करा हे ऑप्शन दिसेल लॉगिन करा मध्ये जाऊन योजना चा लाभ घ्यायचा असेल त्या योजनेसाठी अर्ज केला जाऊ शकतो, व हा अर्ज 31 जुलैपर्यंत स्वीकारला जाईल त्यामुळे 31 जुलै पर्यंत अर्ज नागरिक करू शकणार आहेत.