पी एम किसान योजनेचा हप्ता वितरित होता कधी होणार? याबाबत शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे, त्याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा नमो शेतकरी योजना बद्दल विचारणा केली जात आहे, त्यामुळे पीएम किसान योजनेचा हप्ता नेमका कधी येणार यावर शासन निर्णय आलेला आहे का? आलेला असेल तर याची तारीख ठरलेली आहे का? अशी संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे जण घेण्याचा प्रयत्न करूया.
पी एम किसान योजना हप्ता
पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता कधी वितरित केला जाणार? याची तारीख 9 जुलै नंतर ठरवली जाणार आहे, देशाचे पंतप्रधान विदेशी दौऱ्यावर असल्याने 9 जुलै नंतर या संबंधित पीएम किसान योजनेच्या वितरणासंबंधी तारीख ठरवली जाईल, व साधारणतः 18 जुलै पर्यंत पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केला जाऊ शकतो, अशा प्रकारची शक्यता वर्तवली जात आहे. एम किसान योजनेमध्ये जवळपास 93 लाख शेतकरी पात्र होतील व हे सर्व शेतकरी नमो शेतकरी योजनेमध्ये सुद्धा पात्र ठरतील.
नमो शेतकरी योजना हप्ता
नमो शेतकरी योजनेचा हप्ता पी एम किसान योजनेचा हप्ता वितरित केल्यानंतर दिला जाईल, हप्ता वितरित करण्यापूर्वी त्या संबंधित निधी वितरण व त्याच पद्धतीने या संबंधित एक तारीख ठरवली जाईल व त्यानंतर शेतकऱ्यांना नमो शेतकरी चा हप्ता वितरित केला जाईल अशा प्रकारे नमो शेतकरी योजना व पी एम किसान योजनेच्या हप्त्यासंबंधीची अपडेट असून, 9 तारखे नंतर पी एम किसान योजनेच्या हप्ता वितरणा संबंधित अपडेट पुढे येणार आहे.
तुमचा हप्ता पी एम हप्ता किसानचा येणार की नाही? हे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता