शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना चालू करण्यात आलेली आहे, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये ची रक्कम दिली जाते, व पी एम किसान योजनेचा पुधील हप्ता कधी मिळणार? याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागलेली आहे, लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरीत केल्यानंतर शेतकऱ्यांना पीएम किसान चा योजना कधी मिळणार? हा प्रश्न निर्माण झालेला असल्याने आपण जाणून घेऊयात की पी एम किसान योजनेचा हप्ता याबद्दल तारीख ठरवण्यात आलेली आहे का? कोणत्या तारखेला हप्ता मिळू शकतो? तसेच कोणत्या प्रकारची पी एम किसान योजनेबद्दल प्रक्रिया चालू झालेली आहे? असे संपूर्ण माहिती खालील प्रमाणे जाणून घेऊया.
ज्या शेतकऱ्यांची ॲग्री स्टॅग वर नोंदणी झालेली आहे, अशा शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करून अशा शेतकऱ्यांची पी एम किसान योजनेच्या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला होता, शासनाच्या माध्यमातून वारंवार प्रयत्न केले जात आहे की जास्तीत जास्त शेतकरी पी एम किसान योजनेअंतर्गत जोडले जावे व तसेच एक कारण पुढील हप्ता वितरणाबाबतही आहे, 20 टक्के पेक्षा जास्त शेतकरी ॲग्री स्टॅग वर नोंदणी केलेली नाही, त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी सुद्धा नोंदणी करावी अशा प्रकारचे आवाहन वारंवार शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केले जात आहे.
ऍग्री स्टॅक वर नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना नोंदणी लवकरात लवकर करून आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी अशा प्रकारचे आवाहन महसूल विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे, त्यामुळे या संबंधित 15 जून ही तारीख शेतकऱ्यांना दिलेली असून या तारखेपर्यंत शेतकऱ्यांना ही संपूर्ण प्रोसेस पूर्ण करायची आहे, त्यामुळे अर्थातच 15 जून नंतर पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता मिळण्याची शक्यता आहे या संबंधित कोणतीही तारीख शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेली नाही परंतु ॲग्री स्टॅग वर नोंदणी करण्याची 15 जून तारीख देण्यात आलेली असल्याने या तारखेनंतरच हप्त्याचे वितरण केले जाईल.
या तारखेपर्यंत राज्यात सर्वदूर पोहोचणार मान्सून, पंजाब डख यांचा हवामान अंदाज