रेशन धान्य दुकानासाठी अर्ज मागवले जात आहे तुम्हाला जर रेशन धान्य दुकान चालू करायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते, रिक्त असलेल्या रेशन दुकानासाठीचे अर्ज मागवले जात असतात व अशाच अर्जा संबंधित अर्ज चालू झालेले आहे, त्यामुळे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील आहात? तुम्हाला अर्ज करता येणार का? व अर्ज कोणत्या जिल्ह्यातील चालू झालेले आहे? त्याच पद्धतीने अर्ज कशा पद्धतीने करायचा या संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
सातारा जिल्ह्यातील व यवतमाळ जिल्ह्यातील रेशन धान्य दुकानासाठीचे अर्ज मागविले जात आहे, त्यामुळे तुम्ही जर या दोन जिल्ह्यांपैकी एका कोणत्याही जिल्ह्यातील असाल तर तुम्हाला अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे, सातारा जिल्ह्यातील 141 व यवतमाळ जिल्ह्यातील 321 दुकानासाठीचे अर्ज मागविले जात आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये अर्ज करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी 30 जुलै पर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी त्याच पद्धतीने यवतमाळ मधील असलेल्या रेशन धान्य दुकानासाठी 31 जुलै पर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. सातारा मधील वाई तालुक्यातील 15 गावे, कराड तालुक्यातील 6 गावे, महाबळेश्वर तालुका 44 गावे, कोरेगाव तालुका 13 गावे, खटाव तालुका 10 गावे, फलटण तालुका 4 गावे, पालटण तालुका 19 गावे, माण तालुका 4 गावे, खंडाळा तालुका 7 गावे, जावली तालुक्यातील आठ गावे असे एकूण 141 ठिकाणी अर्ज मगवीले जात आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यामधील 2, पुसद तालुक्यातील 31, वनी तालुक्यातील 55, घाटंजी तालुक्यातील 20, केळापूर मधील 30, घरी जामणी मधील 10, बाबुळगाव मधील 13, दारव्हा मधील 4, राळेगाव मधील एकूण 43, यवतमाळ मधील 19, कळम मध्ये 25, आर्णी मधील 9, दिग्रस मधील 6, मारेगाव मधील 24, नेर मधील 8 अशा 321 गावांमध्ये अर्ज मागवले गेलेले आहे.
अर्ज प्रक्रिया
अर्जाचा नमूना तहसील कार्यालयामध्ये उपलब्ध होणार आहे, शंभर रुपयाचे शुल्क भरून हा नमुना उपलब्ध होईल, ग्रामपंचायत बचत गट अशाप्रकारे यांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे, यामध्ये प्राधान्य क्रमानुसार निवड केली जाणार आहे, अशा प्रकारे तहसील कार्यालयाच्या माध्यमातून अर्ज प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते.