रेशन कार्ड ला आधार कार्ड लिंक आहे की नाही? लगेच मोबाईल वरून अशा पद्धतीने चेक करा | Reshan CARD 

राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात रेशन कार्डच्या माध्यमातून शासन रेशन कार्डधारक नागरिकांना धान्याचा पुरवठा दर महिन्याला करते, त्याच पद्धतीने यामध्ये काही प्रमाणात बदल करण्यात येतात, तर कोरोनाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात मोफत धान्य सुद्धा वितरण केले गेलेले होते, जे रेशन कार्डधारक आहेत, अशांना दर महिन्याला रेशन प्राप्त होते, परंतु यामध्ये दिवसेंदिवस काही चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याने रेशन कार्डधारक नागरिकांना काही महत्त्वाच्या बाबी पूर्ण करणे गरजेचे आहे.

 

रेशन कार्ड धारक नागरिकांना आपल्या रेशनकार्डासोबत कुटुंबातील ज्या व्यक्तींची नावे रेशन कार्डवर असेल त्या सर्वांचे रेशन कार्ड सोबत आधार कार्ड जोडून त्या ठिकाणी त्यांची केवायसी करणे बंधनकारक आहे. मागील काही दिवसांमध्ये गावोगावी उपक्रम राबवले गेलेले होते, त्यामध्ये घरोघरी जाऊन रेशन धान्य दुकानदारांनी नागरिकांची केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली होती, तर काहींच्या घरी पूर्ण सदस्यांची उपस्थिती नसणे अशा सर्व कारणामुळे काही जणांची आधार कार्ड जोडनी पुर्ण नाही, तर अशांनी आता रेशन कार्ड जोडणी करून घ्यावे व त्यांनी हे सर्व प्रक्रिया पूर्ण केलेली असेल अशांनी त्याचे स्टेटस कसे बघावे हे सुद्धा जाणून घेऊया.

 

आधार कार्ड लिंक स्टेटस चेक प्रक्रिया

 

स्टेटस बघण्यासाठी सर्वप्रथम https://mahafood.gov.in ओपन करून घ्यावी, ऑनलाइन रास्त भाव दुकाने यामध्ये जाऊन ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली ओपन करा, त्यानंतर एक वेबसाईट ओपन होईल रेशन कार्ड निवडून नो युवर रेशन कार्ड यावरचा, त्या ठिकाणी एक कॅपच्या कोड दिला जाईल त्या कॅपचा कोडला जशास तसे त्या बॉक्समध्ये इंटर करा, रेशन कार्ड नंबर टाका व्ह्यू वर जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती दाखवली जाईल. अशा अत्यंत सहज प्रक्रियेतून तुम्ही स्टेटस बघू शकता. तुमचे आधार कार्ड रेशन कार्ड लिंग झालेले असल्यास त्या ठिकाणी दाखवले जाईल.

Leave a Comment