सौर कृषी पंपाच्या तक्रारीची सुविधा महावितरण ॲप वर उपलब्ध, शेतकऱ्यांना करता येईल ऑनलाइन तक्रार | Saur Krushi Pamp Takrar 

राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सौर कृषी पंपाचे वितरण केले जात आहे, परंतु सौर कृषी पंप दिल्यानंतर काही बिघाड आल्यास शेतकऱ्यांना सहजरित्या त्यांना दुरुस्ती करणे ही सुविधा उपलब्ध होत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना आता दुरुस्तीसाठीची सर्व सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी शासनाच्या माध्यमातून महावितरण ॲपवर ऑनलाईन पद्धतीने तक्रार करण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

 

महावितरण ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सौर कृषी पंप बाबत तक्रार करणे सोपे झालेले आहे, ऑनलाइन तक्रार करण्यासाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर यावे अधिकृत संकेतस्थळ ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी शेतकऱ्याला सौर कृषी पंपाबाबत तक्रार करण्याचे ऑप्शन देण्यात आलेले आहेत, ते ऑप्शन निवडून त्या ठिकाणी विचारलेली माहिती भरावी.

 

कोणत्या प्रकारचे बिघाड सौर कृषी पंप मध्ये आहे हे निवडा, त्यानंतर सर्व माहिती सबमिट करा व सबमिट केल्यानंतर पुढील काही दिवसातच शेतकऱ्यांना त्या तक्रारीचे निवारण करण्यात बाबत माहिती दिली जाईल व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाईल. अशाप्रकारे शेतकरी महावितरनच्या माध्यमातून अत्यंत सहजरीत्या सौर कृषी पंपाबाबत असलेल्या समस्यांचे निवारण, बिघाडीचे निवारण करू शकतात.

 

खरीप पिक विमा अर्ज 2025, मोबाईल मधून पिक विमा भरण्याची संपूर्ण प्रोसेस 

Leave a Comment

WhatsApp Icon