शेतकरी असल्याचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे, दाखला कसा व कुठे काढायचा? काय आहे संपूर्ण प्रोसेस? | Shetkti Dakhala Prosess

Aapla shetkari

शेतकरी असल्याचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे, दाखला कसा व कुठे काढायचा? काय आहे संपूर्ण प्रोसेस? | Shetkti Dakhala Prosess

Shetkti Dakhala Prosess, आवश्यक कागदपत्रे, काय आहे संपूर्ण प्रोसेस?, दाखला कसा व कुठे काढायचा?, शेतकरी असल्याचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे

देशामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची संख्या आहे, व अशा सर्व शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या योजनांचा लाभ घेताना विविध प्रकारच्या सवलती दिल्या जातात, व याच सवलती शेतकऱ्यांना मिळवायच्या असेल तर त्यांच्याकडे शेतकरी असल्याचा दाखला असणे अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल व तुमच्याकडे शेतकरी दाखला नसेल तर शेतकरी दाखला कसा काढायचा? अर्ज कुठे करायचा? अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, तसेच संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.

 

शेतकरी दाखला शेतकऱ्याकडे उपलब्ध असायला हवा, कारण विविध प्रकारच्या सवलतींचा लाभ त्याच पद्धतीने शासकीय योजनांमध्ये शेतकऱ्यांना प्राधान्य अशा विविध बाबींचा लाभ शेतकऱ्यांना घेता येतो, त्यामुळे शेतकरी दाखला काढण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे शेतकऱ्याकडे असणे आवश्यक आहे.

 

आवश्यक कागदपत्रे

 

  • आधार कार्ड
  • पॅनकार्ड
  • रहिवासी दाखला
  • मोबाईल क्रमांक
  • पासपोर्ट साइज फोटो
  • मतदान कार्ड
  • रेशन कार्ड
  • सातबारा
  • आठ अ
  • पाण्याचे बिल

 

अर्ज कुठे व कसा करावा?

 

शेतकऱ्यांना सेतु सेवा केंद्रात किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन त्या ठिकाणी अर्ज प्रक्रिया करावी लागते, व अर्ज करण्यासाठीं आपले सरकार सेवा केंद्रामध्ये अधिकृतपणे लॉगीन करून, महसूल विभागाची वेबसाईट निवडा, त्या ठिकाणी ओपन झाल्यानंतर शेतकऱ्याला शेतकरी दाखला हे ऑप्शन दिसेल, हे ऑप्शन निवडून त्या ठिकाणी शेतकऱ्याची सर्व डीटेल्स विचारली जाईल, ती संपूर्ण माहिती भरावी लागेल, व त्यानंतर काही आवश्यक शेती विषयक कागदपत्रे सुद्धा अपलोड करावे लागणार आहे.

 

सातबारा, आधार कार्ड, वरील प्रमाणे दाखवलेली कागदपत्रे अपलोड योग्य साईज नुसार करून, शुल्क भरावे ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरल्याची पावती सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध होईल, व अर्ज सबमिट केल्यानंतर येत्या एका महिन्याच्या आत शेतकऱ्याचा दाखला शेतकऱ्यांना मिळेल. वरीप्रमाणे शेतकरी अत्यंत सहजरित्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन शेतकरी दाखला काढू शकतात.

 

 

MahaDBT अंतर्गत शेतकरी लॉगिन प्रोसेस, ठिबक सिंचन सह पाईपलाईन अनुदान योजनांची अर्ज प्रक्रिया मोबाइल वरून

Leave a Comment

WhatsApp Icon