यवतमाळ जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद योजनांचे अर्ज सुरू झालेले आहे, त्यामुळे जिल्हा परिषद शेषफंड योजनेच्या माध्यमातून तारकुंपण पीव्हीसी पाईप अनुदान त्याच पद्धतीने पीठ गिरणी, झेरॉक्स मशीन, अशा विविध बाबींसाठी अनुदान दिले जाणार आहेत, व यासाठीचे अर्ज चालू झालेले असून अर्ज प्रक्रिया 31 मे पर्यंत चालणार आहे, परंतु यानंतर अर्ज प्रक्रिया बंद होणार असल्याने जे नागरिक यवतमाळ जिल्ह्यातील असतील व या सर्व अनुदान योजनांचा लाभ घेऊ इच्छित असेल तर त्यांनी लगेच अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
जिल्हा परिषद योजनांच्या माध्यमातून विविध बाबींचा समावेश आहे त्यामध्ये पीठ गिरणी, शिलाई मशीन, झेरॉक्स मशीन, वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी शेतीलात काटेरी कुंपण, पाईप तसेच तीन एचपी विद्युत मोटार पंप यासह एकूणच 16 बाबींसाठी ही योजना राबवली जात आहे, अशा सर्व योजनांसाठी लाभ घेऊ इच्छित असणाऱ्या नागरिकांनी खालील दिलेल्या पद्धतीनुसार अर्ज करावा.
अर्ज प्रक्रिया अशा प्रकारे
ही योजना यवतमाळ जिल्हा पुरती मर्यादित असून या योजनेचा लाभ यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक व महिला घेऊ शकणार आहे, त्यामुळे सर्वप्रथम अर्ज करण्यासाठी https://yavatmalyojana.com संकेतस्थळ ओपन करून, नवीन नोंदणीवर जाऊन त्या ठिकाणी आपले नाव व मोबाईल नंबर प्रविष्ट करून आलेला ओटीपी एंटर करावा, तालुका व गाव निवडून त्या ठिकाणी पासवर्ड टाका निवडलेला पासवर्ड पुन्हा एंटर करून, नोंदणी पूर्ण होईल.
मोबाईल नंबर व पासवर्ड टाकून लॉगिन करावे, त्यानंतर जेवढ्या बाबींसाठी योजना चालू आहे, त्या बाबी दाखवण्यात येईल, त्यासमोर कागदपत्रे त्याच पद्धतीने योजना अर्ज करण्याची तारीख सर्व दाखवली जाईल, या योजनेचा तुम्हाला अर्ज करायचा आहे, त्यामध्ये जाऊन त्यामध्ये नाव, गाव शेतीचा सर्वे नंबर किती क्षेत्र आहे अशा प्रकारची संपूर्ण माहिती भरावी, बँकेसंबंधी सर्व डिटेल तसेच आधार कार्ड नंबर अशी संपूर्ण माहिती भरावी.
त्याच पद्धतीने शेवटी तुम्ही जो अर्ज भरत आहात त्या संबंधित कोणती कागदपत्रे अपलोड करायची आहे, त्या ठिकाणी दाखवली जाईल व संपूर्ण कागदपत्रे दोन एमबी पेक्षा कमी साहित्य अपलोड करावी, त्यानंतर स्वयंघोषणा देऊन त्या ठिकाणी पुन्हा एकदा अर्ज चेक करून ओटीपी पाठवून अर्ज सबमिट करावा अशा पद्धतीने अत्यंत सहजरीत्या विविध बाबींसाठीचा अर्ज वरील पद्धतीने भरता येऊ शकते.