राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शिलाई मशीन योजना राबवली जाते व प्रत्येक जिल्ह्यामध्ये विविध कालावधीमध्ये शिलाई मशीन योजने अंतर्गत अर्ज मागविले जातात, व जालना जिल्ह्यामध्ये आता शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज मागवले जात आहे, त्यामुळे तुम्ही जर जालना जिल्ह्यातील असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे अर्ज कसा करावा? लागणारी कागदपत्रे? त्याच पद्धतीने संपूर्ण योजनेसंबंधीत माहिती खालील प्रमाणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
अर्ज करण्याचा कालावधी
महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून शिलाई मशीन योजनेचे अर्ज चालू करण्यात येतात, जालना जिल्ह्यामध्ये अर्ज चालू झालेले असून 1 जुलैपासून अर्ज प्रक्रिया चालू झालेली आहे व 30 जुलै पर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
कोणत्या महिलांना मिळणार शिलाई मशीन?
ज्या महिला जालना जिल्ह्यातील आहे व अनुसूचित जाती या प्रवर्गातील महिला म्हणजेच SC या गटातील महिला पात्र ठरतील.
अर्ज कसा करावा?
जालना जिल्ह्याच्या जिल्हा परिषद योजना या पोर्टल ला मोबाईल मध्ये ओपन करा, योजनेचे अर्ज, प्रक्रियेचे पोर्टल ब्राउझर मध्ये उपलब्ध होईल, ऑनलाइन अर्ज करण्यासाठी त्या ठिकाणी शिलाई मशीन योजना अर्ज असे दाखवले जाईल त्यामध्ये जाऊन त्यावर क्लिक करून विचारले गेलेले संपूर्ण माहिती भरावी, व खालील प्रमाणे देण्यात आलेली सर्व कागदपत्रे अपलोड करावी.
अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- बँक खाते पुस्तक
- मोबाईल क्रमांक
- शिलाई मशीन चे प्रशिक्षण घेतल्या बाबतचे प्रमाणपत्र
- दारिद्र रेषेखालील कुटुंबातील असल्यास दारिद्र रेषेचे प्रमाणपत्र
- यापूर्वी योजनेचा लाभ न घेतल्या बाबतचे घोषणापत्र
- टीसी
- मतदान कार्ड
अशाप्रकारे जिल्हा परिषद योजनेच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेली शिलाई मशीन योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेली आहे त्यामुळे तुम्ही जर जालना जिल्ह्यातील असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने शिलाई मशीन साठी अर्ज करू शकता.
अर्ज लिंक:- शिलाई मशीन अर्ज
लाडक्या बहिणींचा हप्ता आला नसेल तर लगेच तक्रार करा, ऑनलाइन तक्रार प्रोसेस