देशामध्ये मोठ्या प्रमाणात सोलर पॅनलच्या संबंधित विविध प्रकारच्या योजना चालू करण्यात आलेल्या आहे, व या योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणात शेतकरी घेताना दिसतात व आता शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोलार पॅनल संबंधित एक नवीन ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे, त्यामध्ये सोलर पॅनल तुटले असेल किंवा काही बिघाडाला असेल त्यांचे दुरुस्ती अशा प्रकारची संपूर्ण प्रक्रिया करण्यासाठीचे एक ऑप्शन ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
कुसुम सोलर पंप योजना किंवा महावितरण च्या माध्यमातून राबविण्यात येत असलेली योजना अशा विविध प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोलार पंपाचा लाभ दिला गेलेला आहे व अशात शेतकऱ्यांना शेतीमध्ये काही अडचणीमुळे सोलर पंपाबाबतच्या वेगवेगळ्या अडचणी त्याच पद्धतीने त्यांची नादुरुस्ती होणे अशा विविध अडचणी शेतकऱ्यांना असल्याने शेतकऱ्यांना एक प्रकारची सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे होते, त्यामुळे आता शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी सोलार पंपाचा लाभ घेतलेला असेल तर दुरुस्ती किंवा काही अडचणीसाठी एकाच ठिकाणी सर्व सुविधा या उपलब्ध होणार आहे.
सोलर पंपाचा लाभ घेत असताना शेतकऱ्यांना सोलार पंपासाठी पाच वर्षाच्या गॅरंटीनुसार इन्शुरन्स काढला जातो, व त्यामुळे काही अडचणी असल्यास शेतकऱ्यांना त्या अडचणी दुरुस्त करून दिल्या जातात परंतु आतापर्यंत अशा प्रकारची कोणतीही ऑप्शन नसल्याने ती सोलर पंपात बिघाड झाल्यानंतर शेतकऱ्यांना तक्रारीसाठी कोणतेही ऑप्शन नव्हते परंतु आता, शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची सोलर पंपा संबंधी अडचण असल्यास pmkusum या ठिकाणी तक्रार दाखल करता येणार, शेतकऱ्यांनी मोबाईल नंबर एंटर करून शेतकऱ्याला तक्रार दाखल करता येणार आहे, अशाप्रकारे आता शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने तक्रार दाखल करण्याची ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.