विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व विद्यार्थ्यांना आता कोणत्याही ठिकाणी न जाता थेट शाळेमध्ये ST पास ची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे, त्याच पद्धतीने एसटी बसच्या फेऱ्या थांबवू नये अशा प्रकारचे आदेश सुद्धा त्यांनी दिलेले आहे, त्यामुळे प्रतापराव सरनाईक विद्यार्थ्यांच्या पास च्या सुविधे बद्दल काय म्हणाले ते आपण बघूयात.
राज्यातील शाळा व महाविद्यालये आता चालू झालेले आहे, त्यामुळे विद्यार्थी अनेक ठिकाणी एसटी बसच्या माध्यमातून शाळेमध्ये प्रवास करतात अशा ठिकाणी विद्यार्थी पास काढतात परंतु पास काढत असताना डेपो मध्ये जाऊन त्या ठिकाणी लांब प्रोसेस करून त्यानंतर पास दिली जाते, परंतु आता प्रतापराव सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांना शाळेमध्ये एसटी पास ची सुविधा 5 लाख 21 हजार विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे व आतापर्यंत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी एसटी पास शाळेतून काढलेली आहे.
विद्यार्थ्यांना 1/3 पर्सेंट एवढी रक्कम भरून पास दिली जाते, तर विद्यार्थिनींना म्हणजेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींना बाराव्या वर्गापर्यंत पास ही मोफत दिली जाते, कोणत्याही प्रकारचे शुल्क विद्यार्थिनींना भरावे लागत नाही, व अशा सर्व बाजूच्या सुविधा शाळेमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे त्याच पद्धतीने अनेक वेळा बस च्या फेऱ्या रद्द केल्या जातात सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार शाळेच्या बसच्या फेऱ्या रद्द केल्या जाऊ नये, असे सुद्धा सांगितलेले आहे म्हणजेच विद्यार्थ्यांना वेळेवर एसटी बस सुविधा उपलब्ध होईल.