मान्सूनचा हंगाम चालू झालेला असल्याने शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुद्धा चालू झालेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी करत असताना टोकण यंत्र अनुदानावर देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून महाडीबीटी पोर्टलवर अर्ज प्रक्रिया चालू करण्यात आलेली आहे, त्यामुळे तुम्ही जर टोकन यंत्रासाठी अर्ज करू इच्छित असाल तर महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस खालील प्रमाणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.
टोकण यंत्र अर्ज प्रक्रिया
शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम महाडीबीटी पोर्टलवर यावे, त्यानंतर त्या ठिकाणी शेतकरी लॉगिन करा हे ऑप्शन दिसेल त्यामध्ये तुम्हाला फार्मर आयडी टाकून लॉगिन करावे लागेल, फार्मर आयडी माहिती नसल्यास त्याच ठिकाणी फार्मर आयडी जाणून घ्या हे ऑप्शन असेल त्यामध्ये जाऊन शेतकऱ्याचा आधार क्रमांक टाकून शेतकऱ्याला त्या ठिकाणी शेतकरी फार्मर आयडी प्राप्त होईल, तो फार्मर आयडी पुन्हा एंटर करून लॉगिन करून घ्यावे. त्या ठिकाणी प्रोफाइल पूर्ण करा वर जाऊन प्रोफाइल 100% पूर्ण करावे लागेल, त्या ठिकाणी विचारलेली संपूर्ण माहिती भरून प्रोफाइल पूर्ण करा.
घटकासाठी अर्ज करा वर जाऊन कृषी यांत्रिकीकरण हा पर्याय निवडा, त्यानंतर कृषी यंत्र व अवजारासाठीचे अर्टल सहाय्य हे ऑप्शन निवडा, मनुष्य चलित अवजारे हे ऑप्शन तपशील मध्ये निवडा, त्यानंतर अवजारामध्ये टोकन यंत्र निवडा, तसेच मी पूर्वसंमतीशिवाय अवजारे विकत घेणार नाही, अशी पूर्वसंमती दिलेली असेल त्यावर राईट ऑप्शन निवडून बाब जतन करा निवडा. त्यानंतर अर्ज जमा करा वर जाऊन त्या ठिकाणी अर्ज जमा करायचा आहे. तुम्ही जर यापूर्वी अर्ज केलेला असेल तर तुम्हाला पेमेंट करावे लागणार नाही, परंतु तुम्ही पहिल्यांदा अर्ज करत असाल तर ते 23 रुपये 60 पैसे एवढे पेमेंट करावे लागणार.
अशाप्रकारे वरील दिलेल्या संपूर्ण माहिती भरून शेतकऱ्यांना टोकण यंत्र अनुदानासाठी अगदी डिटेल्स नुसार अर्ज प्रक्रिया महाडीबीटी फार्मर पोर्टलवरून पूर्ण करता येणार आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी लवकर अर्ज केला अशांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याने लवकरात लवकर शेतकऱ्यांनी वरील दिलेल्या प्रोसेस नुसार अर्ज करावा.