ट्रॅक्टर अनुदान योजना 2025 अर्ज सुरू, ऑनलाइन अर्ज संपूर्ण प्रोसेस, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य | Tractor Anudan Yojana Arj 

राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, महाडीबीटी पोटऱ्याच्या माध्यमातून ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठीचे अर्ज प्रक्रिया चालू झालेले आहे, त्यामुळे तुम्ही जर महाराष्ट्रातील शेतकरी असाल व तुम्हाला जर ट्रॅक्टर अनुदान मिळवायचे असेल तरी ही संधी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकणार आहे, महाडीबीटी पोर्टल वर आता अर्ज प्रक्रिया चालू झालेली असून, यामध्ये जवळपास दीड लाखापर्यंतचे ट्रॅक्टर साठी अनुदान दिले जाते, अर्ज प्रक्रिया संबंधी संपूर्ण माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

 

महाडीबीटी ट्रॅक्टर अनुदान योजना अर्ज प्रोसेस

 

  • अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम महाडीबीटी पोर्टल ओपन करा, त्या ठिकाणी फार्मर आयडी टाकून सर्वप्रथम लॉगिन करून घ्यावे.

 

  • लॉगिन करण्यासाठी फार्मर आयडी माहिती नसल्यास आधार क्रमांक टाकून फार्मर आयडी जाणून घ्या ह्या ऑप्शन वर जाऊन फार्मर आयडी शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी दाखवला जाईल.

 

  • लॉगिन केल्यानंतर तुम्हाला प्रोफाइल पूर्ण करायची आहे त्या ठिकाणी प्रोफाइल पूर्ण करा वर जाऊन तुमचे नाव तसेच संपूर्ण माहिती भरून प्रोफाइल शंभर टक्के पूर्ण करा.

 

  • त्यानंतर घटकासाठी अर्ज करा हे ऑप्शन निवडून कृषी यांत्रिककरण हे ऑप्शन निवडायचे आहे त्या ठिकाणी ट्रॅक्टर अनुदान योजना हे ऑप्शन निवडा.

 

  • कोणते एचपी चा ट्रॅक्टर घेणार आहात या संबंधित एचपी निवडावा लागेल, वरील सर्व बाबी योग्य आहेत यावर टिक करून जतन करा हे ऑप्शन निवडा.

 

  • अर्ज सादर करा हे ऑप्शन निवडून त्या ठिकाणी तुम्ही निवडलेल्या बाबी पुन्हा एकदा चेक करून अर्ज सादर करा मध्ये जाऊन पेमेंट करा 23.60 रुपयाचे पेमेंट ऑनलाईन पद्धतीने करा.

 

  • व अर्ज जमा होईल व तुम्हाला त्या ठिकाणी मेसेज सुद्धा दाखवला जाईल, अशा प्रकारे ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज अत्यंत सहजरित्या अर्ज केला जाऊ शकतो, वरील प्रोसेसने अर्ज शेतकरी करू शकतात.

ट्रॅक्टर योजना अर्ज करण्यासाठी लिंक: https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin

शेत जमिनीची वाटणी करण्याबाबत कायदेशीर बाबी, काय म्हणतो कायदा, एकदा बघाच!

Leave a Comment

WhatsApp Icon