अनेक शेतकऱ्यांना जमिनीच्या वारसा हक्क संबंधित प्रश्न निर्माण होतो, त्यांना वारसा हक्काची नोंदणी कशी करावी? त्यासाठी लागणारी कोणती कागदपत्रे आहेत त्याच पद्धतीने नोंदणी प्रक्रिया करण्यासाठी किती कालावधी लागतो? अशी संपूर्ण माहिती नसल्याने त्यांना अशा प्रकारच्या नोंदणीच्या प्रक्रिया करत असताना अडचणी निर्माण होतात, त्यामुळे आपण वारसा हक्क नोंदणी प्रक्रियेस संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.
जमिनीवर कुणाचा हक्क आहे? हे सातबारा कोणाच्या नावावर आहे यावरून कळते व शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसांचे नाव त्याच्या सातबाऱ्यावर चढते, व त्यासाठी काही प्रमाणात कायदेशीर प्रक्रिया करून हे वारसाचे नाव सातबारावर चढवावे लागते, व याच सर्व प्रक्रियेला वारसा हक्क नोंदणी प्रक्रिया असे म्हणतात.
वारसा हक्क नोंदणी प्रक्रियेसाठी लागणारा कालावधी?
वारसा हक्क नोंदणी प्रक्रिया करत असताना पूर्वीपासून ते सातबारावर नाव चढेपर्यंतचा एकूण कालावधी 30 ते 45 दिवसांचा असतो तर काही वेळेला यापेक्षा जास्त काळ सुद्धा वारसा हक्क नोंदणी प्रक्रियेसाठी लागतो.
आवश्यक कागदपत्रे
- मृत्यू प्रमाणपत्र
- वारस प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- इतर वारस असल्यास त्यांचे संमती पत्र
- रहिवासी दाखला
- फेरफार अर्ज
- जमिनीचा सातबारा उतारा
वारसा हक्क नोंदणी प्रक्रिया अर्ज
- वारसा हक्क नोंदणी प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी काही ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आलेले आहे, तर काही ठिकाणी जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी फेरफार अर्ज सादर करावा लागतो.
- त्याच पद्धतीने फेरफारस सोबत काही आवश्यक कागदपत्रे वरील प्रमाणे देण्यात आलेले आहे, ती सुद्धा जमा करावी लागतात व त्यानंतर, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्व कागदपत्रांची तपासणी केली जाते व शेतकऱ्यांच्या वारसाची तपासणी केली जाते.
- त्यानंतर गावामध्ये इश्तीहार लावला जातो म्हणजेच या वारसा हक्क नोंदणीची कोणाला हरकत आहे का? व त्या कालावधीमध्ये कोणाला हरकत असल्यास त्याची तपासणी केली जाते व सर्व झाल्यावर कुणालाच हरकत नसल्यास पुढे प्रोसेस केली जाते.
- त्यानंतर वारसाची नावे सातबारा चढवली जातात, व मंजुरीची नोंद केली जाते व अशा प्रकारे ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर वारसदाराचे नाव सातबारा मध्ये दिसायला लागते अशा प्रकारची वारस हक्क नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते.