राज्य शासनाच्या माध्यमातून पंढरपूरच्या वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी एक विठ्ठल रुखमाई वारकरी योजना चालू करण्यात आलेली आहे, या योजनेच्या माध्यमातून अपघात झाल्यास, अपंगत्व तसेच दवाखान्यासाठीचा खर्च वारकऱ्यांना दिला जाणार आहे, त्यामुळे शासनाने जाहीर केलेली ही नवीन विठ्ठल रखुमाई वारकरी योजना काय आहे? त्या संबंधित संपूर्ण माहिती खालील प्रमाणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.
विठ्ठल रुखमाई वारकरी योजने संबंधित जीआर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, व त्यामध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार वारी चालू झाल्याच्या दिनांक पासून वारी बंद होईपर्यंतच्या दिनांक दरम्यान एक प्रकारचे विमा कवच पंढरपूरच्या येणाऱ्या वारकऱ्यांना मिळणार आहे, 16 जून ते 10 जुलै या तारखे दरम्यान वारकऱ्याचा अपघात होणे, दुर्घटनेने मृत्यू होणे, जखमी होणे यासाठी विविध प्रकारचे विमा कवच वारकऱ्यांना दिले जाईल
या वारकऱ्यांना मिळणार एवढे विमा कवच
1) अपघात किंवा दुर्घटनेने मृत्यू पावलेल्या वारकऱ्यांच्या नातेवाइकांना किंवा वारसदारांना – 4 लाख रुपये
2) वारीदरम्यान अपंगत्व आल्यास–
- 40 ते 60 टक्के अपंगत्व आल्यास- 74000रू
- 60 टक्याहून अधिक अपंगत्व आल्यास 2.50 लाख
3)1. वारकरी एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यास- 16000 रू
2. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी दवाखान्यात दाखल झाल्यास- 5400 रू
अर्ज कुठे करावा?
पंढरपूरला पायी जाणारे, खाजगी किंवा सार्वजनिक वाहनाने जाणारे वारकरी या योजनेसाठी पात्र ठरतील, वरील बाबींचा दावा करताना पंढरपूर वारीसाठी गेल्या बाबतचे तहसीलदाराचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असेल, अर्ज हा जिल्हाधिकारी त्यांच्याकडे लागणार आहे, त्यामध्ये मृत्यू झाल्यास मृत्यू प्रमाण दवाखान्यामध्ये भरती असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र जमा करावे लागेल, व त्यानंतर अनुदान दिले जाईल.
बांधकाम कामगार भांडी वाटप योजना, भांडी वाटप करण्यासाठी अशी करा नोंदणी, तर मिळेल भांडी